Donald Trump : एकीकडे इराण-इस्रायल युद्ध थांबलं तर दुसरीकडे ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं, युरोपियन राष्ट्रांची अमेरिकेकडे 'ही' मागणी

Donald Trump : एकीकडे इराण-इस्रायल युद्ध थांबलं तर दुसरीकडे ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं, युरोपियन राष्ट्रांची अमेरिकेकडे 'ही' मागणी

अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता पुन्हा येणार असे चित्र दिसत असताना फ्रान्स, जर्मनी आणि इटली यांसारख्या देशांनी अमेरिकेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

इराण, इस्रायल यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धाला विराम लागल्यानंतर सध्या युरोपामध्ये वेगळेच टेन्शन निर्माण झाले आहे. अमेरिकेमध्ये जागतिक अस्थिरता आणि वाढत्या तणावामुळे ट्रम्प यांची सत्ता पुन्हा येणार असे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रान्स, जर्मनी आणि इटली यांसारख्या देशांनी अमेरिकेत ठेवलेले त्यांचे सोने परत करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनाचे संकेत मिळत असल्यामुळे हे भीतीचे वातावरण निर्माण आहे.

युरोपीय देश त्यांचे सोने अमेरिकेतून परत आणून, ते आपल्या देशात किंवा इतर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सध्या प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या तिजोरीत युरोपियन देशांचा लाखो टन सोन्याचा साठा आहे. मात्र युरोपीय देशांना अमेरिकेतील सोन्याच्या सुरक्षिततेबद्दल शंका आहे. एकीकडे अमेरिकेचे लोक ट्रम्प यांना वैतागले असून दुसरीकडे युरोपीय देश अमेरिकेकडील आपले सोने परत मागवत आहे.

ट्रम्प यांनी अनधिकृतपणे सर्वच संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जर ट्रम्प यांनी फेडवरही नियंत्रण मिळवले तर आपले अमेरिकेमधील सोने मिळणे कठीण होऊन जाईल अशी भीती युरोपियन देशांना वाटू लागली आहे. युरोपियन करदाता संघटनेने (TAE) आपले सोने परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून ते परत मिळावे अशी मागणी केली आहे. याउलट जरी सध्या ते परत मिळवता आले नाही तरी त्याचे निदान ऑडिट झाले पाहिजे असे युरोपियन देशांचे म्हणणे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com