Gondia
ताज्या बातम्या
Gondia : गोंदियात तब्बल 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण; सर्व नक्षलवाद्यांवर 89 लाख रुपयांचं होतं बक्षीस
गोंदियात तब्बल 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Gondia ) गोंदियात तब्बल 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातल्या दरेकसा येथे त्यांनी आत्मसमर्पण केले.
माओवाद्यांच्या एमएमसी स्पेशल सोनल कमिटीचा प्रवक्ता अनंत याच्यासह 11 लोकांनी आत्मसमर्पण केलं असून स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता अनंत याने आत्मसमारपणासाठी आधी 1 जानेवारीपर्यंत वेळ देण्याची मागणी तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र त्याच्याआधीच आत्मसमर्पण करण्यात आले.
आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी MMC झोनचे असल्याची माहिती मिळत आहे. सर्व नक्षलवाद्यांवर 89 लाख रुपयांचं बक्षीस होते.
Summery
गोंदियात तब्बल 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
सर्व नक्षलवाद्यांवर 89 लाख रुपयांचं होतं बक्षीस
आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी MMC झोनचे
