तुम्ही उपमुख्यमंत्री आहात म्हणून…; ओवैसी यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

तुम्ही उपमुख्यमंत्री आहात म्हणून…; ओवैसी यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

अमरावतीत एमआयएमची काल सभा झाली.
Published by :
Siddhi Naringrekar

अमरावतीत एमआयएमची काल सभा झाली. तिथे ओवैसी बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्याला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर दिलं आहे.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, देवेंद्र फडणवीसजी, एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त ज्ञान आम्हाला देऊ नका, आम्हालाही थोडं ज्ञान आहे. आपण उपमुख्यमंत्री आहात याचा अर्थ असा नाही की जे तोंडात आलं ते बोलत राहाल. फडणवीस यांनी हे विसरू नये की, इथे कोणीही मूळ भारतीय नाही. केवळ आदिवासी हेच मूळ भारतीय आहेत. कारण आम्हीही इतिहास चांगल्या प्रकारे जाणतो. औरंगजेबाची अवलाद कोणाला म्हणतात हे आम्हाला कळत नाही का? असे ओवैसी म्हणाले.

उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे त्यांनी काहीही बोलू नये. जर त्यांनी हे मुस्लिमांना म्हटलं नाही तर मग कोणाला म्हटलं? याचं स्पष्टीकरण द्यावं. तुम्ही आधी बोलता अन् मग म्हणता की मी मुसलमानांबद्दल नाही बोललो. मग तुम्ही काय राक्षसांना बोलता काय? तुम्ही काय गोडसेच्या औलादीला बोललात काय? असा सवाल ओवैसींना विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com