Raj Thackeray & Asaduddin Owaisi
ताज्या बातम्या
राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच अचानक ओवैसी औरंगाबादेत धडकले; हालचालींना वेग
औरंगाबादचे AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी इफ्तार पार्टीसाठी असदुद्दीन ओवैसी पोहोचले आहेत
औरंगाबाद येथे 1मे रोजी होणाऱ्या मनसेच्या सभेला आता परवानगी मिळाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुणे येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून महाआरती केल्यांनंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत औरंगाबादच्या या सभेची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या सभेची मोठी चर्चा सुरु होती. आता सभा अगदी उद्यावर असताना राज ठाकरे हे औरंगाबादेत दाखल झाले आहेत. तर, AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे देखील आज औरंगाबादेत पोहोचले आहेत.
औरंगाबादचे AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी इफ्तार पार्टीसाठी असदुद्दीन ओवैसी पोहोचले आहेत.