Asaram Bapu
Asaram BapuTeam Lokshahi

बलात्कार प्रकरणात आसारामला जन्मठेपेची शिक्षा

याआधी 2018 मध्ये जोधपूर न्यायालयाने आसारामला उत्तर प्रदेशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
Published by :
Sagar Pradhan

आसाराम बापू यांच्याबद्दल आता मोठी बातमीसमोर आली आहे. आधीच शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू आता पुन्हा एक गुन्ह्यात दोषी ठरले आहे. सुरत येथील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामला दोषी ठरवले. याआधी 2018 मध्ये जोधपूर न्यायालयाने आसारामला उत्तर प्रदेशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Asaram Bapu
उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधानांची महत्वाची माहिती; म्हणाले, आशा, आकांक्षा...

शिष्याच्या बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सोमवारी दोन बहिणींवरील बलात्कार केल्या प्रकरणी आसारामला दोषी ठरवले होत. यानंतर आज शिक्षा सुनावण्यात आली. आसारामने 2001 ते 2006 दरम्यान महिलेवर अनेक वेळा बलात्कार केला, जेव्हा ती शहराच्या बाहेरील आश्रमात राहत होती. ऑक्टोबर 2013 मध्ये सूरत येथील एका महिलेने आसाराम आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा आरोप केला होता. खटला सुरू असताना एका आरोपीचा मृत्यू झाला. जुलै 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com