“कोमट" पाण्यातील गॅरंटीच्या "चकल्या"!!  आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“कोमट" पाण्यातील गॅरंटीच्या "चकल्या"!! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर ट्विटरवरून जोरदार टीका केली. 'कोमट' पाण्यातील गॅरंटीच्या 'चकल्या' या शीर्षकाने त्यांनी ठाकरे पक्षाला डिवचले.
Published by :
shweta walge
Published on

मुंबई भाजपचे आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून त्याला "कोमट पाण्यातील गॅरंटीच्या चकल्या!!" असे शीर्षक दिले आहे. या पोस्टद्वारे त्यांनी ठाकरे पक्षाला चांगलेच टोमणे काढण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका

ज्यांच्या मुख्यमंत्री काळात, मंत्री गेले, खासदार गेले.. गेले आमदार आणि नगरसेवक ही.. जवळपास गेली ना, सगळीच पार्टी.. तेच सांगतात त्यांचीच चालते महाराष्ट्रात गॅरंटी ?ज्यांना त्यांच्याच माणसांनी केले पायउतार तेच स्वतःच्या गॅरंटीची स्वतःच वाजवतात सतार! टोमण्यांची बॅग झाली वाटतं तपासणीत जप्त..यांचा वॉरंटी संपलेला "फराळ" थोडा इथं खपतो! अस ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

संजय राऊतांवर टीका

एक PUC न काढलेले तोंड रोजच बोलते. विश्वविख्यात प्रदुषण सकाळी सकाळी करते.त्यांचाच संसर्ग त्यांच्याच पक्षात वाढतोय."कोमट" पाण्यात गॅरंटीच्या "चकल्या" बघा कोण पाडतोय? अस ट्विट करत त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

आशिष शेलार यांचं ट्विट

ज्यांच्या मुख्यमंत्री काळात

मंत्री गेले, खासदार गेले..

गेले आमदार आणि नगरसेवक ही..

जवळपास गेली ना, सगळीच पार्टी..

तेच सांगतात त्यांचीच चालते महाराष्ट्रात गॅरंटी ?

ज्यांना त्यांच्याच माणसांनी केले पायउतार

तेच स्वतःच्या गॅरंटीची स्वतःच वाजवतात सतार!

एक PUC न काढलेले तोंड रोजच बोलते

विश्वविख्यात प्रदुषण सकाळी सकाळी करते

त्यांचाच संसर्ग त्यांच्याच पक्षात वाढतोय

"कोमट" पाण्यात गॅरंटीच्या "चकल्या" बघा कोण पाडतोय?

टोमण्यांची बॅग झाली वाटतं तपासणीत जप्त..

यांचा वॉरंटी संपलेला "फराळ" थोडा इथं खपतो!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com