ashish shelar | uddhav Thackarey
ashish shelar | uddhav Thackarey Team Lokshahi

मुंबई महापालिका निवडणूक कधी असणार? आशिष शेलार बोलता बोलता महिन्यासहीत सर्वच सांगून गेले

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात आशिष शेलार बोलत होते. भाजपाने विलेपार्ले येथे आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी आशिष शेलार बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, राजाचा जीव जसा पोपटावर होता तसा यांचा जीव मुंबई महापालिकेत आहे. यांच्याकडून पालिका आपल्याला काढून घ्यायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आरपीआयला सोबत घेऊन आपल्याला 151 जागा जिंकायच्याच आहेत. असे शेलार म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लागली तर आपल्याकडे फक्त 120 दिवस उरतात. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचेही आदेश दिले आहेत. यावरुन आता ऑक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com