Ashish Shelar : काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची "मशाल"

Ashish Shelar : काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची "मशाल"

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत पार पडला.
Published by :
Siddhi Naringrekar

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत पार पडला. यावेळी जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता आशिष शेलार यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन... आपल्याला हवे तेवढे... शिवतीर्थावर भाषण करणारे..

◆श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला ?

◆भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का?

◆भाषणाची सुरुवात

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!”

अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ?

◆स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल "मर्दा"सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का?

◆ हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने

"हिंदुत्वाला केले तडीपार" हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच "शिवतीर्थावर" सभा घेण्यात आली होती का?

◆सभा एक झालेय.. पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेलेय..

काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची "मशाल"

आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा..

अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!! असे म्हणत आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com