ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे. यातच आता अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'वास्तव में Truth' या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना "समजा शिवसेना फुटली, नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. विविध पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता आशिष शेलार म्हणाले की, "त्या दोघांचा पक्ष त्या दोघांनी ठरवावं. त्यांनी आपापसात ठरवलं आहे तर त्यांना शुभेच्छा. एकाने साथ घातली, दुसऱ्याने अट घातली. पण ती अट आहे की कट आहे? दोघांचा पक्ष आहे. त्यांनी ठरवावं. वैयक्तिक वैगरे आतापर्यंतचे जे शब्द होते ते पुरे करा. माझ्यादृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वैगरे होते तो विषय संपला."

"कालच देवेंद्रजींनी प्रतिक्रिया दिली आहे, दोघंही एकत्र दिसतील तर आम्हाला आनंद आहे. आज मी ही तेच म्हटले आहे. राजकीय याच्यावर योग्य वेळेला भाषण करु. अट आणि बाकी कट हा त्यांनी टाकलेला मुद्दा आहे. आमचा मुद्दाच नाही आहे. त्यामुळे आम्ही कुठूनही विचलित नाही. आम्ही स्वयंचलित आहोत. सगळ्यांनी आपापल्या कुटुंबात सुखी राहावं."

यासोबतच ते पुढे म्हणाले की, "आमचे काही म्हणणं नाही. तो आनंदाचा विषय आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी यातून काहींनी बाहेर यावे आणि माझे एकत्रित कुटुंबाचा विचार करावा. याच्याबद्दल आम्हाला काही त्रास व्हायचा मुद्दा. आम्ही संघ परिवार म्हणून एक कुटुंब आहोत. महायुती म्हणून कुटुंब आहोत, तसेच पुढे राहू." असे आशिष शेलार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com