मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात भेट; 
यावर झाली चर्चा...

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात भेट; यावर झाली चर्चा...

शनिवारी (16 मार्च) मध्यरात्री माजी मुख्यमंत्री व भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली.
Published by :
shweta walge

शनिवारी (16 मार्च) मध्यरात्री माजी मुख्यमंत्री व भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. उपोषण स्थळापासून जवळच असलेल्या घरात चव्हाण व जरांगे यांच्यात दिड ते दोन तास चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणातील मुद्द्यांवर चर्चा झाली. 

यावेळी मनोज जरांगे यांनी अशोक चव्हाण यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. सरकार कडुन मराठा समाजाची दिशाभुल झाली,सगे सोयरे अधिसुचना व कायद्याची अंमलबजावणी होत नाही ,देवस्थान व हैदराबाद चे गॅजेट स्विकारत नाही, खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, चौकशी करीता बोलावुन त्रास दिला जात आहे, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस घेतले गेले नाही अशा तक्रारी केल्या.

मराठा आरक्षणावर चर्चेतून मार्ग निघणे गरजेचे आहे. त्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आपण करू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली.

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात भेट; 
यावर झाली चर्चा...
राहुल गांधींच्या सभेवरुन बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल; बाळासाहेबांचा तो व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. एप्रिलपासून देशात सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडेल, महाराष्ट्रातही ५ टप्प्यांत मतदान होणार असून राज्यासाठी ही निवडणूत अत्यंत अटीतटीची राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com