Ashok Pawar: अशोक पवारांच्या मुलाला अपहरण करुन मारहाण केल्याचा गंभीर आरोप

Ashok Pawar: अशोक पवारांच्या मुलाला अपहरण करुन मारहाण केल्याचा गंभीर आरोप

शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उमेदवार अशोकराव पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून त्याला बेदम मारहाण करण्यात आली.
Published by :
Team Lokshahi
Published on

शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उमेदवार अशोकराव पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून त्याला जबरदस्तीने विवस्त्र करून व तिथे एका स्त्रीला आणून तिला विवस्त्र करून फोटो काढण्यात आले आसल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली आहे. तर यामध्ये अशोक पवार यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. ऋषीराज पवार असे आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे नाव असून शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com