तर अशोक सराफ मुख्यमंत्री झाले असते; राज ठाकरे म्हणाले...
अशोक सराफ यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, प्रशांत दामले आणि अशोक सराफ हे दोन्ही माझे आवडते कलाकार आहेत. मोठ्या माणसांचा सत्कार करायला मोठी माणसं राहिलेली नाहीत. त्यामुळं आमच्यावर आटोपावं लागते.कलावंत, दिग्दर्शक, पेंटर, आर्टिस्ट, कवी, संगीतकार, नाट्य, चित्रपट नसतं तर काय झालं असतं, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. हे लोकं नसते तर आपल्या देशात अराजक आलं असतं. असे राज ठाकरे म्हणाले.
याशिवाय प्रशांत दामले यांनी साडेबारा हजार प्रयोग केले. अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, सिरीअल येथे काम केलंय. आता फक्त ओटीटी प्लॅटफार्म राहिलाय. इतकी वर्षे हे कलाकार काम करतात. अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेत असती तर आजे ते मुख्यमंत्री असते. ४० फूट कटआउटवर तुमच्यावर दूध टाकलं गेलं असतं. आपल्याकडं कलावंत आहे का ठीक आहे. येवढ्यावर आपल्याकडं आटोपलं जातं. अशोक सराफ यांचं मूळ घराण बेळगावचं असल्याचं आज कळलं. जन्म मुंबईचा. मला असं वाटतं खरा सीमाप्रश्न तुम्ही सोडविलात. असे त्यांनी म्हटले आहे.