Ashwini Bidre Murder Case : 'हे नऊ वर्ष आमच्यासाठी खूप कठिण होते, माध्यमांमुळेच...'; निकालापूर्वी मुलीनं व्यक्त केली भावना
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाप्रकरणी 11 एप्रिल रोजी पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली होती. सुनावणीत आरोपींना शिक्षा सुनावली जाणार होती. पंरतू, हत्याप्रकरणातील दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलल्यात आली. याप्रकरणी उद्या, 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी पार पडणार आहे. तसेच हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, महेश पळणीकर, कुंदन भंडारी यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान, अश्विनी बिद्रे यांच्या मुलीने निकालाच्या एक दिवसआधी आपला व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये तिने आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
"गेली नऊ वर्ष आमच्यासाठी खूप कठिण होती. या दरम्यान, पोलीस ठाण्याच्या फेऱ्या, केसच पाठपुरावा, कोर्टाची तारीख हे सर्व करावं लागलं. विशेष म्हणजे माध्यमामुळे ही केस निकालापर्यंत आली, असल्याने मी सर्वांचे आभार मानते. शिवाय आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी करते," असे व्हिडिओत नमूद केले आहे.