जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक - जयंत पाटील

जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक - जयंत पाटील

सांगलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सांगलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर जातीची अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पध्दतीचे अपडेटस् आले आहेत.

खत विक्रेत्याला जात सांगितल्याशिवाय शेतकऱ्याला यापुढे खत मिळणार नाही. हे ऑप्शन सिलेक्ट केल्याशिवाय खरेदीची पूर्ण होणार नसल्याचे सांगितले जात आहे. शेतकर्‍यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्‍यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. त्यामुळे आता खतासाठी जात कशाला पाहिजे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल. त्यामुळे समाजातील जातीभेद आणखी वाढेल. असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com