ताज्या बातम्या
Atal Setu : अटल सेतू 14 तासांसाठी बंद, कारण काय?
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रविवारी मॅरेथॉन आयोजित केली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रविवारी मॅरेथॉन आयोजित केली आहे. यासाठी 14 तास अटल सेतू वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. अटल सेतूवरील वाहतूक 15 फेब्रुवारी रात्री 11 ते 16 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत इतर सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. ही मॅरेथॉन रविवारी पहाटे 4 ते 12पर्यंत चालणार आहे.
वाहतूक कोंडीसह जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मॅरेथॉनसाठी रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवरील वाहतूक बंद राहणार आहे.
रविवारी दुपारी 1 वाजल्यापासून अटल सेतूवरील वाहतूक सुरळीत होणार असून नवी मुंबई व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना इतर पर्यायांचा वापर करावा लागणार आहे.