Atiq Ahmad And AshrafTeam Lokshahi
ताज्या बातम्या
मोठी बातमी! प्रयागराजमध्ये अतिक आणि अशरफची हत्या
वैदकीय चाचणी करण्यासाठी घेऊन जाताना दोघांची हत्या करण्यात आली आहे.
माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील झाशी येथे अतिक अहमदचा मुलगा असद चकमकीत मारला गेल्या. त्याच्या मृत्युच्या काही दिवसांनंतर आता अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.