मस्साजोगनंतर आता मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला; काच फोडून गाडी पेटवण्याचा प्रयत्न

मस्साजोगनंतर आता मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला; काच फोडून गाडी पेटवण्याचा प्रयत्न

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ओमकार कुलकर्णी, धाराशिव

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बीडची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा सरपंचावर हल्ला करण्यात आला आहे.

सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गाडीच्या काचा दगडाने फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यात गाडीत असलेले सरपंच आणि त्यांचे भाऊ जखमी झाले आहेत.

पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून रात्री एक वाजता हा प्रकार घडला आहे. यावर हल्ला झालेले सरपंच यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अचानक दोन टू व्हिलर आले. दोन्ही पण टू व्हिलर हॉर्न वाचवत होते. आम्ही जशी गाडी स्लो केली तशी डाव्याबाजूचा दरवाजा फोडला आणि पेट्रोलचे फुगे मारले आणि अंडी फेकून मारली. अंडी फेकून मारल्यानंतर पुढचे मला काहीच दिसते नव्हते. मग माझी गाडी परत स्लो झाली नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. असं जर करत असतील तर महाराष्ट्राचे काय व्हायचे? असं जर घडत असेल तर पोलीस संरक्षण दिलं तर चांगलेच आहे. असे ते सरपंच नामदेव निकम म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com