समृद्धी महामार्गावरुन औरंगाबाद ते नागपूर एसटी बस धावणार, 15 डिसेंबरपासून होणार सुरुवात

समृद्धी महामार्गावरुन औरंगाबाद ते नागपूर एसटी बस धावणार, 15 डिसेंबरपासून होणार सुरुवात

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला लोकार्पण करण्यात आले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला लोकार्पण करण्यात आले. समृद्धी महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आला आहेतब्बल 10 जिल्ह्यातील 26 तालुके आणि 391 गावातून जाणारा समृद्धी महामार्ग अखेर प्रवासासाठी सुरु करण्यात आला आहे.

या महामार्गावरून 15 डिसेंबरपासून औरंगाबाद ते नागपूर ही बस धावणार आहे. ही गाडी किती वाजता सोडायची याबाबत अद्याप निर्णय झाला नाही आहे. 15 डिसेंबरपासून औरंगाबाद ते नागपूर अशी एसटीची एक्स्प्रेस समृद्धी महामार्गावरून धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सद्या या महामार्गावरून चारचाकी आणि मोठ्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र आता लवकरच यावरून एसटीच्या एक्स्प्रेस बस देखील धावणार असून, याची तयारी एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com