Team India : ऑस्ट्रेलिया मालिका संपली, भारताचा पुढील सामना कोणाशी होणार?

Team India : ऑस्ट्रेलिया मालिका संपली, भारताचा पुढील सामना कोणाशी होणार?

भारताच्या संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला, या दौऱ्यात भारताच्या संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • ऑस्ट्रेलिया मालिका संपली

  • भारताचा पुढील सामना कोणाशी होणार?

  • भारताचा कसोटी संघ

भारताच्या संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला, या दौऱ्यात भारताच्या संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर त्यानंतर पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. यामधील झालेल्या तीन सामन्यात भारताच्या संघाने दोन सामने जिंकले आणि एक सामन्यात पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकल्यानंतर, भारतीय संघ लवकरच आपल्या पुढील मोहिमेवर जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे भारताने मालिका जिंकली. आता टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे, त्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी मालिका ( India vs South africa Test Series ) सुरू होणार आहे, पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे खेळला जाणार आहे. तर, भारत आणि दक्षिण आफ्रिका त्यांचे सामने कधी खेळतील ते जाणून घेऊया.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका : कसोटी मालिकेचे वेळापत्रक

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – १४ ते १८ नोव्हेंबर – कोलकाता

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २२ ते २६ नोव्हेंबर – गुवाहाटी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका

पहिला सामना: ३० नोव्हेंबर, रांची

दुसरा सामना – ३ डिसेंबर, रायपूर

तिसरा सामना – ६ डिसेंबर, विशाखापट्टणम

IND विरुद्ध SA T20I मालिका: भारत-दक्षिण आफ्रिका T20 मालिका

पहिला सामना: ९ डिसेंबर, कटक

दुसरा सामना – ११ डिसेंबर, न्यू चंदीगड

तिसरा सामना – १४ डिसेंबर, धर्मशाला

चौथा सामना – १७ डिसेंबर, लखनौ

पाचवा सामना – १९ डिसेंबर, अहमदाबाद

भारताचा कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत ( यष्टीरक्षक ), यशस्वी जैस्वाल , केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल , ध्रुव जुरेल , रवींद्र जडेजा , वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह , अक्षर पटेल, नितीश कुमार , मोहम्मद अकुंल रेड्डी , दीप राजकुमार , दीपराज, साई सुदर्शन.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com