Ayodhya Mosque : ताजमहालपेक्षाही भारी असणार अयोध्येतील मशीद

Ayodhya Mosque : ताजमहालपेक्षाही भारी असणार अयोध्येतील मशीद

अयोध्येतील मशीद ही ताजमहालपेक्षाही भारी असणार असल्याचे बोलले जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अयोध्येतील मशीद ही ताजमहालपेक्षाही भारी असणार असल्याचे बोलले जात आहे. अयोध्येतील धन्नीपूर येथे 'मोहम्मद बिन अब्दुल्ला' ही भव्य मशीद देखील बांधण्यात येणार आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन (IICF) या मशिदीच्या बांधकामावर देखरेख ठेवत असल्याची माहिती मिळत आहे.

या मशिदीचे डिझाइन पुण्यातील आर्किटेक्ट इम्रान शेख यांनी तयार केलं आहे. मशिद डेव्हलपमेंट कमिटीचे प्रमुख पद हे महाराष्ट्रातील भाजप नेते हाजी अरफात शेख यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. आता बांधण्यात येणारी ही मशीद भारतातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी असणार आहे. असे शेख यांनी म्हटले आहे.

ही मशीद ताजमहाल पेक्षा चांगली असेल आणि यामध्ये जगातील सर्वात मोठे 21 फूटांचे कुराण उभारण्यात येणार आहे तसेच पुण्यातील आर्किटेक्ट इम्रान शेख यांनी तयार केलेले नवीन डिझाइन हे फेब्रुवारीच्या अखेरीस तयार असे सांगण्यात येत आहे.

मशिदीतील दिवे सूर्यास्ताच्या वेळी सुरू होतील आणि सूर्योदयाच्या वेळी आपोआप बंद होतील. याचे बांधकाम रमजाननंतर 2024 च्या उत्तरार्धात सुरू होईल. तरुणांसाठी दुबईपेक्षाही मोठे फिश एक्वेरियम येथे बांधण्यात येणार आहे. पाच मिनार असलेली भारतातील पहिली मशीद असणार आहे. ही माहिती हाजी अरफात शेख यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com