Baba Siddiquie
ताज्या बातम्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; 26 पैकी 8 आरोपींना पोलीस कोठडी
या सर्व 26 आरोपींना मकोका कोर्टात आणण्यात आले होते
थोडक्यात
बाबा सिद्दीकी यांची हत्या प्रकरण
26 पैकी 8 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी
19 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे.
या प्रकरणात आता 26 पैकी 8 आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. इतर 19 आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
या सर्व 26 आरोपींना मकोका कोर्टात आणण्यात आले होते. या प्रकरणात अनमोल बिश्नोईचे नाव समोर आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.