firing on baba Siddiqui
ताज्या बातम्या
Baba Siddique यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
बाबा सिद्दिकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे.
बाबा सिद्दिकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे. बाबा सिद्दिकींच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येनं नागरिक दाखल उपस्थित झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून नागरिकांना शांतपणे दर्शन घेण्याची विनंती करण्यात येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार होणार आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. बडा कब्रस्तान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी होणार आहे. अॅम्ब्युलन्समध्ये त्यांचे पार्थिव मरिनलाईन्सकडे नेण्यात येत आहे. दरम्यान, त्या परिसरात पावसाला सुरुवात ही झाली आहे.