Baba Vanga Predictions 2025: एलियन्सचा धोका ते कॅन्सरपासून सुटका; 2025 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी काय?
बाबा वेंगा यांना 'बल्गेरियन पैगंबर' म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. 1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन होण्यापुर्वी त्यांनी 5079 पर्यंतची भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. 'भयानक, भयपट! पोलादी पक्ष्यांच्या हल्ल्यानंतर अमेरिकन बांधव पडतील'अशी भविष्यवाणी त्यांनी अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवरील हल्ल्याबद्दल लिहली होती.
बाबा वेंगा यांनी वर्षांपूर्वी सांगितलेली, अमेरिकन ट्विन टॉवर्सवरील 9/11 च्या हल्ल्यापासून ते 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनापर्यंत, प्रत्येक गोष्ट खरी ठरली. अशातच आता नवे वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान त्यांनी 2025 साठी काय-काय होणार याची देखील भविष्यवाणी लिहली आणि त्यांनी 2025 पासून 'विनाशाची सुरुवात' घोषित केली आहे. एवढेच नाही, तर हे वर्ष जगात तिसऱ्या महायुद्धाची पायाभरणीही करू शकते असं देखील सांगितले आहे.
2025मध्ये एलियन्सचा धोका विनाशाची सुरुवात
बाबा वेंगा यांनी सांगितलेले भाकीत गेल्या काही वर्षांमध्ये खरे ठरल्यां पाहायला मिळाल. पैगंबर बाबा वेंगा यांनी 2025 या येत्या नवीन वर्षासाठी देखील काही भाकीत भविष्यवाणी लिहली आहे, ज्यामध्ये असे लिहले आहे की, 2025 मध्ये एलियनशी संपर्क होऊ शकतो. तसेच 2025 मध्ये मानव एलियनचा शोध लाऊ शकतात. याशिवाय येत्या काही वर्षांत लोकसंख्येमध्ये मोठी घट होण्याची शक्यता देखील बाबा वेंगा यांनी घोषित केली आहे.
तसेच युरोपमध्ये राजकीय अस्थिरता तसेच भीषण युद्ध होण्याची शक्यता त्यांनी वर्तावली आहे. हे भाकीत अधिक भयावह आहे. कारण, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध बराच काळ सुरू आहे आणि यामुळे जग हळूहळू दोन भागात विभागले जात आहे. बाबा वेंगा यांनी असाही दावा केला आहे की, पुढील वर्षात 'विनाश' देखील सुरू होऊ शकतो.
बाबा वेंगा यांची कर्करोगावरची भविष्यवाणी काय?
2025मध्ये त्यांनी केलेल्या भविष्यवाणी नुसार सांत्वन देणारी गोष्ट म्हणजे कर्करोगाच्या रुग्णांसाठी येणारे वर्ष आनंदाची बातमी घेऊन येत आहे. कर्करोगाने त्रस्त असणाऱ्यांना 2025 मध्ये शास्त्रज्ञांच्या मदतीने या जीवघेण्या आजारापासून सुटका मिळू शकते असा अंदाज बाबा वेंगा यांच्याकडून लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने कर्करोगावरील लस तयार करण्याची घोषणा केली असून ही लस सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या ट्यूमरला उपाय म्हणून ठरेल असा दावा रशियाने केला आहे.
या दाव्यानुसार, प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये हे सिद्ध झाले आहे की ही लस कर्करोगाच्या ट्यूमरला दाबण्यात यशस्वी आहे. त्यामुळे बाबा वेंगा यांचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र आता बाबा वेंगा यांनी लिहलेले हे भाकीत तसेच हा अंदाज खरा होणार का? याकडे आता लक्ष लागलेलं आहे.

