Crime News
Crime NewsTeam Lokshahi

संगमनेरमध्ये भीमजयंतीला गालबोट; 125 जणांवर गुन्हा दाखल

शांततेत सुरु असलेल्या मिरवणुकीत घुसून काही लोकांनी घोषणाबाजी केल्यानं तणाव निर्माण झाला होता.
Published by :
Sudhir Kakde
Published on

संगमनेर प्रतिनिधी | आदेश वाकळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022) देशभरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. ठिक ठिकाणी वेगवेळ्या कार्यक्रमांचं आयोजनं त्यानिमित्ताने करण्यात आलं होतं. सर्वत्र काल शांततेत आंबेडकर जयंती पार पडली असताना, अहमदनगरच्या (Ahmednagar) संगमनेरमध्ये मात्र आंबेडकर जयंतीला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. शेकडो जणांच्या टोळक्याने शांततेत सुरू असलेल्या शोभायात्रेमध्ये हुल्लडबाजी केली. उत्साहात सुरू असलेल्या शोभायात्रेत तुफान घोषणा देण्यास सुरुवात केल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. घटनास्थळी पोलीस (Sangamner Police) दाखल झाले, त्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Crime News
सदावर्तेंना साताऱ्यानंतर पुणे पोलीस ताब्यात घेणार? वाचा काय आहे प्रकरण

संगमनेर येथील संघर्ष तरुण मंडळाने सायंकाळी शोभायात्रेचं आयोजन केलं होतं. ही शोभायात्रा मेन रोड वरील श्री कृष्ण मंदिराच्या परिसरात आली असता अचानक जवळ असलेल्या गल्लीतून शंभर ते सव्वाशे तरुण शोभायात्रेत घुसून जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. सदरची घटना पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक राहुल मदने दाखल होत शोभायात्रेत घुसलेल्या तरुणांना पोलिसांनी हुसकावले.

Crime News
...तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंनी माफी मागितली होती; शरद पवारांनी दाखवला माफीनामा

शोभायात्रा मार्गस्थ झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आणि मोबाईलच्या आधारे धुडगूस घालणाऱ्या तरुणांची पोलिसांनी धरपकड सुरू केली पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतल असून 125 तरुणावर ऍट्रॉसिटी अंतर्गत संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com