Bachhu Kadu
Bachhu KaduTeam Lokshahi

निकाल शिंदे साहेबांच्याच बाजूने लागणार, बच्चू कडू म्हणाले...

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. कोर्टाच्या या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले आहे की, सुप्रीम कोर्टात निकाल शिंदे साहेबांच्याच बाजूने लागेल. बंडखोरी करणाऱ्यांनाच यश मिळतं हा इतिहास आहे. आजपर्यंत ज्यांनी बंडखोरी केली ते मुख्यमंत्री झाले. जे निष्ठावंत आहे त्यांच्या पदरी निराशा पडते. असे बच्चू कडू म्हणाले.

तसेच भाजप – शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच. अन्यथा १५ विधानसभा जागा लढवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. युतीसाठी आग्रह करु, पण, युती नाही तर स्वतंत्र लढणार. मला दिव्यांग मंत्रयालय दिलं त्यामुळं मी नाराज नाही, माझी बंडखोरीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली.असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com