Bacchu Kadu On Eknath Shinde: "एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत" बच्चू कडू यांची इच्छा

बच्चू कडू यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली.
Published by :
Prachi Nate

महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार बच्चू कडू आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली, ज्यात त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

याचपार्श्वभूमिवर बच्चू कडू म्हणाले की, राजकीय संबंधांमुळे मी एकनाथ शिंदेंना भेटायला आलो नाही, आज त्यांचा वाढदिवस होता म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो आणि एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे...

जुगाराच्या जाहिराती करणाऱ्यांवर कारवाई - बच्चू कडू

पुढे बच्चू कडू म्हणाले की, महाराष्ट्रात जुगारच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटी आणि खेळाडूंची संख्या वाढत आहे... कारण, फक्त 2 दिवसांपूर्वी माझ्या मतदारसंघात एका तरुणाने जुगाराच्या व्यसनामुळे आत्महत्या केली होती... इतके मोठे सेलिब्रिटी आणि खेळाडू अशा जुगाराच्या जाहिराती का करतात? यावर चर्चा करण्याची गरज आहे... यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन करावी जेणे करून जुगाराच्या जाहिराती करणाऱ्या अशा सेलिब्रिटी आणि खेळाडूंवर कारवाई करता येईल...

बीड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न- बच्चू कडू

पुढे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी भाजप आमदार सुरेश धस यांना पुढे आणण्यात आले आणि असे म्हटले जात आहे की, महाराष्ट्रात संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे आणि हे सरकार कुठेतरी ते दाबण्याचा प्रयत्न करत आहे...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com