Bachchu Kadu : 'आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापून...'
Bachchu Kadu : 'आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापून...': बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधानBachchu Kadu : 'आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापून...': बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान

Bachchu Kadu : 'आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापून...': बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान

बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात शेतकरी हक्क परिषदेत आमदारांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले, "आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका." यावर टीका झाल्यानंतर त्यांनी आपले मत पुन्हा व्यक्त केले.
Published by :
Riddhi Vanne
Published on

बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात शेतकरी हक्क परिषदेत आमदारांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले, "आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका." यावर टीका झाल्यानंतर त्यांनी आपले मत पुन्हा व्यक्त केले. त्यांचा म्हणावा होता की, जर रोज 12-13 शेतकरी आत्महत्या करत असतील आणि सरकार काही करत नसेल, तर एकाला कापायला काय हरकत आहे? शेतकऱ्यांना 3 हजार रुपयांना सोयाबीन विकावी लागत आहे, आणि अजूनही एकही खरेदी केंद्र सुरू नाही. देवा भाऊने हमीभावावर 20% बोनस देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तो बोनसही मिळणार नाही.

बच्चू कडू यांनी संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल बोलताना, शिर्के यांना अप्रत्यक्षपणे त्याच्या हत्येसाठी जबाबदार ठरवलं. त्याच वेळी, शेतकऱ्यांच्या हितासाठी संभाजी महाराज लढत राहिले, असं त्यांनी सांगितलं. प्रवीण दरेकर यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "दरेकरांना मंत्रीपद मिळालं नाही, म्हणून ते असं बोलत असतात. शेतकऱ्यांच्या दुःखाची त्यांना कल्पनाही नाही."

नितेश राणे यांच्याबद्दल त्यांनी म्हणाले, "राणे हिंदुत्वावर बोलतात आणि राजस्थानमध्ये जाऊन नमाज वाचतात. त्यांना शेतकऱ्यांचा काही पत्ता नाही." तसेच, त्यांनी प्रज्ञा साध्वीच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यांवर टीका केली, आणि म्हणाले की, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केलं जातं. संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ते म्हणाले की, दोघांमध्ये पक्षांतर्गत वाद आहेत. या सर्व मुद्द्यांवर बोलताना, बच्चू कडू यांनी नेत्यांच्या द्विरुपी वर्तनावर कठोर टीका केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com