Bacchu Kadu : मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर बच्चू कडूंचे रेल रोको आंदोलन रद्द
Bacchu Kadu : मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर बच्चू कडूंचे रेल रोको आंदोलन रद्दBacchu Kadu : मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर बच्चू कडूंचे रेल रोको आंदोलन रद्द

Bacchu Kadu : मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर बच्चू कडूंचे 'रेल रोको' आंदोलन रद्द

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेलं आंदोलन

  • राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या मांडणाऱ्या कडू यांनी आज नागपूरमध्ये नियोजित

  • आज नागपूरमध्ये नियोजित असलेलं ‘रेल रोको’ आंदोलन रद्द केलं आहे.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू असलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या मांडणाऱ्या कडू यांनी आज नागपूरमध्ये नियोजित असलेलं ‘रेल रोको’ आंदोलन रद्द केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू असलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं समजतं. शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याच्या मागणीवर या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शेतकरी आंदोलनासंदर्भातील जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी बच्चू कडू यांचे वकील हरिओम ढगे यांनी न्यायालयाला ‘रेल रोको’ आंदोलन रद्द केल्याची माहिती दिली. न्यायालयाने या निर्णयाचं स्वागत केलं असून प्रशासनाला कायदा-सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हीच आमची एकमेव मागणी आहे. सरकारकडून ठोस निर्णयाची आम्ही अपेक्षा करतो.” आता गुरुवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com