गुवाहाटीला गेल्यानंतर खोके हा विषय नव्हता तर दिव्यांग हा विषय ओके करून ठेवला -बच्चू कडू

गुवाहाटीला गेल्यानंतर खोके हा विषय नव्हता तर दिव्यांग हा विषय ओके करून ठेवला -बच्चू कडू

3 डिसेंबरपासून हे मंत्रालय सुरू होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

सुरज दाहाट|अमरावती: आज दिव्यांगासाठी कॅबिनेट मध्ये वेगळ्या मंत्रालयाची घोषणा झाली असून 3 डिसेंबरपासून हे मंत्रालय सुरू होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. गेल्या वीस वर्षांपासून माजी मंत्री बच्चू कडू यांनी ही मागणी केली होती, नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे गटाचे आमदार व अपक्ष आमदार गुवाहाटीला गेलो असता. कामाख्या देवी सरकारला पावली त्याच रूपाने दिव्यांगाना ही देवी पावली, गुवाहाटीला गेल्यानंतर खोके हा विषय नव्हता तर दिव्यांग हा विषय ओके करून ठेवला,अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

जिल्हा परिषद महानगरपालिका उद्धवजी आणि ठाकरे यांना मी चांगला प्रस्ताव दिला होता. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या माध्यमातून दिव्यांगांचा विकास स्वतः करता आला असता परंतु त्यांची इच्छा दिसली नाही. या सर्व दिव्यांगसाठी आम्ही झोडपे खाल्ले, प्रचंड आंदोलन केले पण आता फक्त एका बैठकीमध्ये हे पुण्याचा काम झालं, मला अपेक्षा नव्हती की हा विषय इतक्या लवकर होईल, गुहाटी ला गेल्यानंतर तिथून शिंदे साहेबांनी सचिवांना फोन लावून आज 29 तारखेच्या कॅबिनेटमध्ये हा विषय लावून धरला, या सरकारचे बच्चू कडू वर उपकार आहे. हे उपकार मी कधीच विसरणार नाही हे पुण्याचं काम ठाकरेंच्या नशिबात नव्हतं असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com