ताज्या बातम्या
भुजबळ-जरांगे वादावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
भुजबळ आणि मनोज जरांगे वादावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला दिलाय.
भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या वादावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला दिलाय. मनोज जरांगेंनी एकेरी भाषेत बोलू नये. तसेच भुजबळांनीही बोलतांना भान ठेवावं. व्यक्तिगत तसेच खालच्या भाषेत बोलू नये असा सबुरीचा सल्ला बच्चू कडू यांनी दिलाय. तसेच आरक्षणाचं जे काही होईल ते कायद्याने होईल. तसेच मराठ्यांविरोधात जो काही आव आणला जात आहे तो चुकीचं असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय