Bala Nandgaonkar On Shivsena UBT MNS Alliance
Bala Nandgaonkar On Shivsena UBT MNS AllianceBala Nandgaonkar On Shivsena UBT MNS Alliance

Bala Nandgaonkar On Shivsena UBT MNS Alliance : युतीची घोषणा झाली, पण ‘बाळा’ नव्हते; नांदगांवकरांच्या पोस्टमागचा अर्थ काय?

मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल ऐतिहासिक युतीची घोषणा केली. या प्रसंगी संजय राऊत देखील मंचावर उपस्थित होते.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Bala Nandgaonkar On Shivsena UBT MNS Alliance: मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल ऐतिहासिक युतीची घोषणा केली. या प्रसंगी संजय राऊत देखील मंचावर उपस्थित होते. पत्रकार परिषदेसाठी ठाकरे बंधूंसोबत संजय राऊत यांना विशेष खुर्ची देखील राखीव ठेवण्यात आली होती. पण युतीची घोषणा करत असताना, मनसेचे जेष्ठ नेता बाळा नांदगांवकर मंचावर उपस्थित नव्हते, ज्यामुळे त्यांचे काय झाले याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. नंतर कळाले की, बाळा नांदगांवकर आजारी असल्यामुळे ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत.

बाळा नांदगांवकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, "बाळासाहेबांचे वाघ एकत्र आले," असं म्हटलं आहे. त्यांनी या युतीला पाठिंबा देताना सांगितलं की, "संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी आपले प्राण दिले, त्यानंतर आजचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. या चळवळीत ‘ठाकरे’ हे महत्त्वाचे नाव होते. ठाकरे घराण्याला प्रबोधनकारांची समाजकारणाची परंपरा होती आणि त्यात बाळासाहेबांनी राजकीय स्वरूप दिलं, ज्यामुळे शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेने केलेली अनेक आंदोलने मराठी माणसासाठी फायदेशीर ठरली, आणि मुंबईचे मराठीपण टिकवून ठेवले."

ते पुढे म्हणाले, "काही काळ दोन्ही ठाकरे कुटुंबीयांमध्ये मतभेद होते, पण त्यांच्या महाराष्ट्रप्रेम आणि हिंदुत्वाची नाळ कधीच तुटली नाही. आज हे दोन भाऊ एकत्र आले आहेत, हे आपल्या मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाचं आहे. मुंबईवर परक्यांचा हल्ला थांबवण्यासाठी सर्व मराठी माणसांनी एकत्र येणं आवश्यक आहे."

बाळा नांदगांवकर यांनी युतीच्या संदर्भात अधिक स्पष्टता देताना सांगितलं, "दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, आणि हे महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी एक मोठं पाऊल आहे. यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वावर होणाऱ्या आक्रमणाला थांबवता येईल."

बाळा नांदगांवकर यांनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट देखील सांगितली, की, "मी बाळासाहेबांना एक शब्द दिला होता की, दोन्ही ठाकरे एकत्र येणारच. मी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहीलो, आणि आज हे सत्यात उतरले." युतीच्या घोषणेमुळे, खासकरून मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. बाळा नांदगांवकर म्हणतात, "मराठी माणसाच्या हक्कांसाठी एकजुट होऊन, आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राचे रक्षण करणे हे आता अत्यावश्यक आहे."

थोडक्यात

  1. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे नेते उद्धव ठाकरे यांनी काल ऐतिहासिक युतीची घोषणा केली.

  2. या ऐतिहासिक प्रसंगी संजय राऊत देखील मंचावर उपस्थित होते.

  3. पत्रकार परिषदेसाठी ठाकरे बंधूंसोबत संजय राऊत यांच्यासाठी विशेष खुर्ची राखीव ठेवण्यात आली होती.

  4. मात्र युतीची घोषणा सुरू असताना मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगांवकर मंचावर उपस्थित नव्हते.

  5. त्यामुळे बाळा नांदगांवकर गैरहजर का होते, याबाबत चर्चांना सुरुवात झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com