Ballarpur bridge
Ballarpur bridge

बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज कोसळला; 17 जखमी

Published by :
Sagar Pradhan

अनिल ठाकरे |चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज कोसळल्याची घटना घडली आहे . या घटनेत जवळपास 17 प्रवाशी जखमी झाले असून यातील बहुतांश लोकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे . मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बल्लारपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 4 यांना जोडणारा व साधारण 30 फूट उंच असा हा ओव्हर ब्रीज आहे .

Ballarpur Bridge
Ballarpur Bridge

अलीकडेच म्हणजे 15 वर्षांपूर्वी हा पूल तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली . रविवारी आज सायंकाळी 5 च्या सुमारास अचानक या पुलावर लोकांना ये - जा करण्यासाठी ज्या सिमेंटच्या पट्टया टाकल्या आहेत त्या खाली रुळावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळ कोसळल्या . त्यामुळे त्यावेळी पुलावर असलेले प्रवाशीही खाली कोसळले . या घटनेने रेल्वे स्थानकावर प्रचंड खळबळ उडाली . जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले .

Ballarpur Bridge
Ballarpur Bridge

जखमींची नावे

साची निलेश पाटील , प्रेम तितरे ( ४५ वर्ष ) , चैतन्य मनोज भगत ( वय १८ ) , निधी मनोज भगत , छाया मनोज भगत , नयन बाबाराव भिवनवार , राधेश्याम सिंग , अनुराग खरतड , रिया खरतड , स्विटी खरतड , विक्की जयंत भिमलवार , पूजा सोनटक्के ( वय ३७ ) , ओम सोनटक्के . यातील राधेश्याम सिंग यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे .

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com