बंगळुरू स्फोटाचं पुणे कनेक्शन? बंगळुरू स्फोटातील संशयित आरोपी पुण्यात आल्याची माहिती

बंगळुरू स्फोटाचं पुणे कनेक्शन? बंगळुरू स्फोटातील संशयित आरोपी पुण्यात आल्याची माहिती

बंगळुरूमध्ये रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी स्फोट झाला होता.
Published by :
Siddhi Naringrekar

बंगळुरूमध्ये रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी स्फोट झाला होता. तपास यंत्रणांनी रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी घेतलं. स्फोटकांनी भरलेली पिशवी ठेवून संशयित दहशतवादी तेथून पसार झाला. या सीसीटीव्हीमध्ये संशयित दहशतवादी आढळून आला.

याच पार्श्वभूमीवर आता बंगळुरू स्फोटातील संशयित आरोपी पुण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संशयिताला पुण्यात बघितल्याचा तपास यंत्रणांकडून दावा करण्यात आला आहे. संशयित बंगळुरू-बेल्लारीतून पुण्याला आल्याची माहिती आहे.

आरोपीने कर्नाटकातल्या गोकर्णमधून बस पकडली. एनआयए अधिकाऱ्यांच्या चौकशीत ही माहिती उघड झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com