ताज्या बातम्या
Kirit Somaiya : बांगलादेशीचं बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण; तिघांना अटक, सोमय्यांची माहिती
अमरावती जिल्ह्यात बांगलादेशी बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात तिघांना अटक, किरीट सोमय्यांनी ट्विटद्वारे दिली माहिती. 14 जणांविरोधी गुन्हा दाखल.
अमरावती जिल्ह्यातील बांगलादेशी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. अमरावती शहरात सुद्धा बनावट जन्म दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यामध्ये 8 लोकांवर गुन्हे दाखल झाले होते. आता पुन्हा तिघांना अटक करण्यात केली आहे. त्यामुळे एकूण 14 जणांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमया यांनी दिली आहे..