Jalna Banjara Protest : बंजारा समाजाचं एसटी आरक्षणासाठी उपोषण; पंकजा मुंडे उपोषणस्थळी दाखल
थोडक्यात
जालन्यात आज बंजारा समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन
जालन्यात विजय चव्हाण यांचे मागील आठ दिवसापासून उपोषण सुरू
जालन्यात उपोषणकर्ते विजय चव्हाणांची पंकजा मुंडेंनी भेट घेतली.
(Jalna Banjara Samaj Andolan) जालन्यात आज बंजारा समाजाच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. जालन्यात एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे. सरकारकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने बंजारा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर जालना शहरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यात विजय चव्हाण यांचे मागील आठ दिवसापासून उपोषण सुरू आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गान करावे असे आवाहन उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी केलं आहे. याचपार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी जालन्यात उपोषणकर्ते विजय चव्हाणांची भेट घेतली आहे.
