Bank
BankTeam Lokshahi

बँकांची कामे आताच उरका, सणांमुळे ऑगस्ट महिन्यांत सुट्याच, सुट्या

ऑगस्ट महिन्यात तुम्हाला बँकेशी (Bank) संबंधित काही कामं करायची असतील तर आताच करा. कारण ऑगस्ट महिना हा सुट्यांचा महिना आहे.
Published by :
Team Lokshahi

ऑगस्ट महिन्यात तुम्हाला बँकेशी (Bank) संबंधित काही कामं करायची असतील तर आताच करा. कारण ऑगस्ट महिना हा सुट्यांचा महिना आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्ट 2022 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays August 2022) जाहीर केली आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या यादीनुसार ऑगस्ट 2022 मध्ये बँका 13 दिवस बंद (Bank Holidays List August 2022) राहणार आहेत

Bank
धनुष्यबाणावरील दावा : निवडणूक आयोगाविरोधात मागितली दाद; शिवसेनेच्या याचिकेवर 1 ऑगस्टला सुनावणी

ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत, ज्या दिवशी बँकांना सुटी असणार आहे. याशिवाय रविवारी दुसरा आणि चौथा शनिवार साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत. या साप्ताहिक सुट्या एकत्र घेऊन ऑगस्टमध्ये संपूर्ण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत.

Bank
कार्पोरेट अफेअर : गुगलच्या सहसंस्थापकाच्या पत्नीचे टेस्लाच्या सीईओशी अफेअर, पुढे काय झाले...

या आहेत सुट्या

1 ऑगस्ट : द्रुपका शे-जी उत्सव ( फक्त सिक्कीममध्येच सुट्टी)

7 ऑगस्ट : पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)

8 ऑगस्ट 2022 – मोहरम (जम्मू आणि श्रीनगर)

9 ऑगस्ट 2022 – चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहराडून, शिमला, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलाँग वगळता मोहरम (आशुरा) निमित्त देशातील इतर ठिकाणी बँका बंद राहतील.

11 ऑगस्ट 2022 – रक्षाबंधन (देशभरात सुट्टी)

13 ऑगस्ट 2022 – दुसरा शनिवार

14 ऑगस्ट 2022 – रविवार

15 ऑगस्ट 2022 – स्वातंत्र्य दिन

16 ऑगस्ट 2022 – पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)

18 ऑगस्ट 2022 – जन्माष्टमी (देशभर सुट्टी)

21 ऑगस्ट 2022 – रविवार

28 ऑगस्ट 2022 – रविवार

31 ऑगस्ट 2022 – गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील.)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com