Ganeshotsav 2025 : अभिनेता सुबोध भावेंच्या घरी बाप्पाचं आगमन
Bappa Arrives At Actor Subodh Bhave's House : आज देशभरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. राजकीय क्षेत्रात तसेच सिनेविश्वातही अभिनेत्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. अभिनेते सुबोध भावेंच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. सुबोध भावेंनी सहपरिवार बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आणि आरती केली. भावे कुटुंबियांनी यंदा शाडूची माती तसेच कार्तिक आणि गणपतीवर आधारित घरगुती देखावा केला.
सुबोध भावेंनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे, त्यावेळेस ते म्हणाले की, "गणपतीच्या लहापणीची गोष्ट आपल्याला माहिती असेल, ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालून कार्तिक जातात पण गणपती मात्र आई-वडीलांना प्रदक्षिणा घालतात, त्यामधून गणपती बाप्पा सांगतात की, कुठल्याही माणसांसाठी आई-वडील त्याच्यांसाठी सर्वस्व असतात. त्यामधून आपल्याला एक संदेश मिळतो. त्यांची आपण प्रार्थना करतो की पाऊस होऊ दे आणि शेतकऱ्यांच कल्याण होऊ दे. यंदा पाऊस चांगला झालाय त्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानातून त्यांना बाहेर पडण्याची शक्ती दे! हीच प्रार्थना मी गणपती बाप्पांना देईन."