Admin
बातम्या
ठाकरे गटाच्या खासदार-आमदारांना बारसूला जाण्यापासून पोलिसांनी रोखलं
कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरु आहे.
कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
यावरच आता ठाकरे गटाच्या खासदार-आमदारांना बारसूला जाण्यापासून पोलिसांनी रोखलं असल्याची माहिती मिळत आहे. बारसू येथे कलम 144 लागू केलं असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बारसू येथील स्थानिकांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांची गाडी रानतळे चेकपोस्टवर पोलिसांनी अडवली आहे.