IPL 2024 All Matches Schedule
IPL 2024 All Matches Schedule

BCCI नं जारी केलं आयपीएल २०२४ चं संपूर्ण शेड्युल, 'या' तारखेला रंगणार अंतिम सामना

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२४ चं अधिकृत शेड्युल जारी केलं आहे. वाचा सविस्तर माहिती.
Published by :

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२४ चं अधिकृत शेड्युल जारी केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या कारणास्तव बीसीसीआयने २२ फेब्रुवारीला आयपीएल २०२४ चं पहिल्या दोन सत्रातील २१ सामन्याचं शेड्युल जारी केलं होतं. परंतु, आज सोमवारी आयपीएल २०२४ चं संपूर्ण शेड्युल घोषित करण्यात आलं आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी २१ मे ला क्वालिफायर-१ सामना खेळवण्यात येईल. यानंतर याच मैदानात बुधवारी २२ मे ला एलिमिनेटर सामना होईल. तसच क्वालिफायर २ आणि अंतिम सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियममध्ये २४ मे ला क्वालिफायर-२ खेळवण्यात येईल आणि पुन्हा शनिवारी ब्रेक संपल्यानंतर २६ मे ला रविवारी याच मैदानावर आयपीएल २०२४ चा अंतिम सामना खेळवण्यात येईल.

IPL 2024 Schedule
IPL 2024 Schedule

दुसऱ्या सत्रात विशाखापट्टणम मध्ये दोन घरेलू सामने खेळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स पुढील सर्व पाच सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. तर, पंजाब किंग्जने मुल्लांपूरच्या न्यू पीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये त्यांच्या सीजनची सुरुवात केली होती. आता दुसऱ्या सत्रात पंजाब किंग्ज त्यांचे सर्व सामने धरमशाला येथे खेळणार आहे.

IPL 2024 Full Schedule
IPL 2024 Full Schedule

पंजाबचा संघ ५ आणि ९ मे ला चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरोधात दोन सामने खेळेल. याशिवाय राजस्थान रॉयल्सही गुवाहाटीत त्यांचे दोन अंतिम सामने खेळणार आहे. १५ मे ला पंजाब किंग्जविरोधात त्यांचा सामना होणार असून १९ मे ला कोलकाता नाईट रायडर्सविरोधात ते सामना खेळणार आहेत. हा सामना आयपीएल २०२४ चा शेवटचा लीग सामना असेल.

आयपीएल २०२४ नॉकआऊट शेड्युल

२१ मे - क्वालिफायर १, अहमदाबाद

२२ मे - एलिमिनेटर, अहमदाबाद

२४ मे - क्वालिफायर २, चेन्नई

२६ मे - फायनल, चेन्नई

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com