Team India
Team India

ठरलं! BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंच्या खांद्यावर टी-२० वर्ल्डकपची मदार

कोणत्या खेळाडूंना टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळालं आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Published by :

Team India Squad For T20 World Cup : आयपीएलचा धडाका सुरु असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केलीय. टी-२० वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु होण्यासाठी अवघ्या एक महिन्यांचा कालवधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी, बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्क्वॉडची घोषणा केलीय. रोहित शर्माच्या खांद्यावर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तर हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपदाची सूत्रे देण्यात आलीय. कोणत्या खेळाडूंना टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळालं आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

टी-२० वर्ल्डकपसाठी 'असा' आहे भारताचा संघ

१) रोहित शर्मा (कर्णधार)

२) यशस्वी जैस्वाल

३) विराट कोहली

४) सूर्यकुमार यादव

५) रिषभ पंत

६) संजू सॅमसन

७) हार्दिक पंड्या (उप कर्णधार)

८) शिवम दुबे

९) रविंद्र जडेजा

१०) अक्षर पटेल

११) कुलदीप यादव

१२) युजवेंद्र चहल

१३) अर्शदीप सिंग

१४) जसप्रीत बुमराह

१५) मोहम्मद सिराज

१६) शुबमन गिल

१७) रिंकू सिंग

१८) के अहमद

१९) आवेश खान

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com