ताज्या बातम्या
Dr. Yogesh Kshirsagar : पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत डॉ. क्षीरसागर भाजपात, अजित पवारांना राजकीय झटका
बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपात प्रवेश केला आहे.
बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपात प्रवेश केला आहे. काही तासांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, राष्ट्रवादीत त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. या बदलामुळे अजित पवारांना बीडमधून मोठा राजकीय झटका बसला आहे.
