बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, सहा प्रवाशांचा मृत्यू

बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, सहा प्रवाशांचा मृत्यू

बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पहाटेच्या सुमारास मुंबईहून बीडच्या दिशेने येत असताना अष्टा हरिनारायण येथे वळण घेताना हा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्सची बस 150 फूट घसरत गेली.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास 45 ते 50 प्रवासी यातून प्रवास करत होते. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com