Beed Dhananjay Deshmukh: मोठी बातमी! अखेर धनंजय देशमुखांचं आंदोलन मागे
बीडच्या मस्साजोग गावात संतोष देशमुखांना न्याय देण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज आंदोलन हे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात होते मात्र त्याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता, त्यामुळे धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना ते दिसून आले.
302 चा गुन्हा दाखल करुन संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला दोषी ठरवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात होत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मसाजोग गावातील मोबाईल टॉवर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल रात्री उशिरा सीआयडी पथकाने धनंजय देशमुख यांची भेट घेतली. मात्र धनंजय देशमुख आंदोलनावर ठाम आहेत.
आता अखेर धनंजय देशमुखांनी त्यांच आंदोलन मागे घेतलं आहे. दरम्यान यावेळी मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील हे त्यांना विनंती करताना दिसून आले तसेच पोलिसांचा बंदोबस्त त्याठिकाणी दिसून आला पोलिस देखील वर चढून त्यांना खाली उरण्याची विनंती करत होते, आणि अखेर आता धनंजय देशमुखांनी त्यांच आंदोलन मागे घेतलं आहे. यादरम्यान त्यांची तब्येत देखील खालावल्याची माहिती मिळाली आहे.