ताज्या बातम्या
संतोष देशमुख हत्या प्रकरण; पैठणमध्ये आज आक्रोश मोर्चा
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे.
थोडक्यात
पैठणमध्ये आज आक्रोश मोर्चा
कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन
मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंब उपस्थित
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, छत्रपती संभाजीराजे, मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, संदिपान भुमरे, बजरंग सोनवणे, संदीप शिरसागर, विनोद पाटील, दीपक भाई केदार हे उपस्थित राहणार आहेत.