उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सुनेत्रा पवार म्हणाल्या...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सुनेत्रा पवार म्हणाल्या...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवदर्शन घेतलं. यावेळी सुनेत्रा पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आज मोठा दिवस आहे म्हणूनच आम्ही गणपती बाप्पाचं आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघंही आलो. जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि मोठा विजय. लोकसभेच्या निवडणुकीचा आज अर्ज भरते आहे. यात मोठा विजय मिळू दे. अशी देवा चरणी प्रार्थना केली आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सगळीकडे बारामती मतदारसंघामध्ये मी फिरत असते तेव्हा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद मिळतो. त्यामुळे नक्कीच विजय आपला होईल यात शंकाच नाही. असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com