Before the formation of the Kalyan Dombivli Municipal Corporation Congress party has clarified its stance
Before the formation of the Kalyan Dombivli Municipal Corporation Congress party has clarified its stance

KDMC : कल्याण डोबिंवली महापालिका; महापौरासंदर्भात काँग्रेसने केला स्पष्ट इशारा

मुंबईसह अनेक मोठ्या शहरांत भाजपाची ताकद वाढली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि धुळे येथेही भाजपाने चांगली कामगिरी केली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजपाने सर्वाधिक यश मिळवत आघाडी घेतली आहे. मुंबईसह अनेक मोठ्या शहरांत भाजपाची ताकद वाढली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि धुळे येथेही भाजपाने चांगली कामगिरी केली. दरम्यान, अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्याचा फटका त्यांना काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये बसल्याचे चित्र आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मात्र वेगळेच राजकारण पाहायला मिळत आहे. शिंदे गटाची शिवसेना सर्वाधिक नगरसेवकांसह पुढे असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. महापौर कोणाचा होणार यावर चर्चा सुरू असतानाच, शिंदे गटाने मनसेसोबत हातमिळवणी केल्याने समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर ठेवून नवी आघाडी तयार होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काँग्रेसने स्वतंत्र भूमिका घेतली आहे. आमचे नगरसेवक एकत्र असून आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. एकूणच महापौर पदासाठी जोरदार हालचाली सुरू असून पुढील काही दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

थोडक्यात

• राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर
• भाजपाने सर्वाधिक यश मिळवत आघाडी घेतली
• मुंबईसह मोठ्या शहरांत भाजपाची ताकद वाढली
• पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, धुळे येथे भाजपाने चांगली कामगिरी
• अजित पवार यांचा वेगळा निर्णय काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपसाठी फटका

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com