Amol Mitkari  : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...
Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला

Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला

अमोल मिटकरींचा टोला: अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, राजकीय चर्चांना उधाण.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Amol Mitkari on Anjali Damania: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमनिया यांची महाराष्ट्र सरकारच्या धोरणात्मक सल्लागार संस्थेतील ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)’ च्या मानद सल्लागारपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर मात्र राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी पोस्ट टाकत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आपली पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पोस्टमध्ये रोहित पवार लिहितात की,

महाराष्ट्र सरकारची think tank असलेल्या मित्रा (MITRA) च्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन..! एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून @anjali_damania ताई ‘सामाजिक’ क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिश जी यांचे ‘आर्थिक विकासाच्या’ क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातले #combination निशितच महत्वपूर्ण राहील. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा..!

तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी यावरून अंजली दमानियांना खोचक टोला लगावलाय. अमोल मिटकरी लिहितात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची प्रचिती परत आली.यावेळी एका स्वयंघोषीत समाजसेविकेने आपल्या पतीला केवळ दुसऱ्यांवर आरोप आगपाखड करण्याच्या निकषावर चक्क शासनाच्या सल्लागारपदी आणुन ठेवले आहे 😃#स्वयंघोषितसमाजसेविका

यासर्व प्रकणावर अंजली दमनिया यांनी प्रत्युत्तर दिले आहे, त्यावेळी त्या म्हणाल्या की, "आताच्या घटकेच्या सुद्धा माझे पती कुठल्याही प्रकारच्या राजकारणात नाहीत. ते मित्र म्हणजे जे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होणारे इंडस्ट्रीज त्याला डव्हायझर म्हणून आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या कुठलाही रोल ना सरकारमध्ये ना ऑपरेशन्समध्ये आणि म्हणजे सगळ्यांपासूनच ते अतिशय लांब बसतात आणि लांब राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com