Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेतून 'या' बहिणींना वगळले,
Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेतून 'या' बहिणींना वगळले, आता चेक करा तुमचं नाव यादीत आहे का नाही? Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेतून 'या' बहिणींना वगळले, आता चेक करा तुमचं नाव यादीत आहे का नाही?

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेतून 'या' बहिणींना वगळले, आता चेक करा तुमचं नाव यादीत आहे का नाही?

लाडकी बहीण योजना: या योजनेतून 'या' बहिणी वगळल्या; तुमचं नाव यादीत आहे का, जाणून घ्या!
Published by :
Team Lokshahi
Published on

'These' sisters excluded from Ladkya Bhahin scheme : महाराष्ट्रामध्ये जूनचा लाडक्या बहीण योजनेचा हफ्ता देण्यास सुरुवात झाली आहे. दर महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारतर्फे जमा केले जातात. मात्र जून महिन्यात या योजनेमधून काही लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आल्याने लाडक्या बहिणी नाराज झालेल्या दिसत आहेत.

2025 साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. जून महिन्याचा हफ्ता अजूनही महिलांच्या बँकेमध्ये जमा झालेला नाही. सध्या सरकारकडून ज्या महिला अपात्र आहेत त्यांची शोधाशोध सध्या सुरु आहे. आतापर्यत बऱ्याच लाडक्या बहिणींची नावे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आली आहेत. काही महिलांनी आपली माहिती खोटी देऊन ह्या योजनेमध्ये आपले नाव समाविष्ट केले होते. तर काहींनी सरकारी नोकरीमध्ये असूनही ह्या योजनेचा लाभ घेत होत्या. अश्या गैरफायदा घेऊन सरकारकडून पैसे घेण्याऱ्या महिलांना या यादीमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता तुमचे ही नाव यादीमध्ये आहे की नाही हे या पडताळून पाहण्यासाठी महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन चेक करावे. मोबाईल नंबर आणि कॅपचा टाकून तुम्ही तुमचे नाव या यादीमध्ये आहे की नाही हे चेक करू शकता.

दरम्यान ज्या प्रामाणिक महिला आहेत. ज्यांनी खरी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत असतील आणि त्यांची ही नावे वगळली गेली असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन याबद्दल तक्रार दाखल करू शकता.

हेही वाचा...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com