Benefits of staying away from social media during exam periods
Benefits of staying away from social media during exam periods

Exam Preparation : परीक्षेच्या काळात सोशल मीडियापासून दूर राहण्याचे फायदे

आज मोबाईल आणि सोशल मीडिया आपल्या जीवनाचा भाग झाले आहेत. पण परीक्षा जवळ आल्या की हेच माध्यम विद्यार्थ्यांसाठी अडचणीचं ठरू शकतं.
Published by :
Riddhi Vanne
Published on

आज मोबाईल आणि सोशल मीडिया आपल्या जीवनाचा भाग झाले आहेत. पण परीक्षा जवळ आल्या की हेच माध्यम विद्यार्थ्यांसाठी अडचणीचं ठरू शकतं. सततचे अलर्ट, व्हिडिओ, चॅट्स यामुळे अभ्यासात खंड पडतो आणि वेळ कसा निघून जातो, हे कळतही नाही.

मोबाईल हातात घेतला की “दोन मिनिटं पाहू” असं वाटतं, पण ती दोन मिनिटं तासात बदलतात. यामुळे अभ्यास मागे पडतो आणि मनावर ताण वाढतो. सोशल मीडियापासून थोडं अंतर ठेवलं तर मन शांत राहतं आणि लक्ष अभ्यासाकडे लागते.

सोशल मीडियापासून दूर राहिल्याचे फायदे

मोबाईल बाजूला ठेवल्याने लक्ष विचलित होत नाही आणि अभ्यास अधिक चांगला होतो. इतरांचे फोटो, यश पाहून होणारी तुलना थांबते, त्यामुळे आत्मविश्वास टिकतो. वाचलेला वेळ उजळणी, सराव किंवा थोड्या विश्रांतीसाठी वापरता येतो.

काय करू शकता?

परीक्षा संपेपर्यंत सोशल मीडियासाठी ठराविक वेळ ठेवा किंवा पूर्णपणे बंद ठेवा. अनावश्यक नोटिफिकेशन्स ऑफ करा. मोबाईल फक्त अभ्यासासाठी वापरा. मोकळ्या वेळेत चालणं, ध्यान किंवा थोडा व्यायाम करा. परीक्षेच्या दिवसांत सोशल मीडियाला ब्रेक देणं म्हणजे स्वतःच्या यशाला प्राधान्य देणं. थोडी शिस्त आणि संयम ठेवल्यास त्याचा फायदा नक्कीच निकालात दिसेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com