Best Bus Conductor : मुंबईतील बेस्ट बस कंडक्टरला मारहाण, खाकी गणवेश फाडत शिवगाळ
थोडक्यात
मुंबईतील बेस्ट बस कंडक्टरला मारहाण प्रकरण
मुंबईच्या एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार
आरोपी राहुल चेतन कच्छार विरोधात गुन्हा दाखल
आरोपीने धमकी देऊन खाकी गणवेश, टी शर्ट फाडला
शिवीगाळ करत कंडक्टरला केलेली मारहाण
मुंबईची दुसरी लाईफलाईन बोलं की डोळ्यासमोर येते म्हणजे बेस्टची बस आहे. पण आता त्याचं बेस्टच्या वाहकाला मारहाण करण्यात आली आहे. आरोपीने धमकी देत वाहकाचे खाकी गणवेश, टी शर्ट फाडला आणि शिवीगाळ करत केलेली मारहाण केली.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार बस कंडकटर हे आपलं शासकीय कर्तव्य बजावत असताना रविवारी दुपारी 1 ते 1.30 वाजताच्या दरम्यान विनय हॉटेल ठाकुरद्वार रोड फॅनसवडी येथे घटना घडली. एल टी मार्ग पोलिसांनी आरोपी राहुल चेतन कच्छार विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 121 ( 1) 132 , 115 (2) आणि 352 गुन्हा दाखल केला आहे. मारहाण केलेला बस कंडकटरचे नाव केशव लोखंडे आहे. हा ड्युटीवर असताना आरोपी राहुल कचछार ने धमकी देऊन खाकी गणवेश आणि टी शर्ट फाडला ,शिवीगाळ करत मारहाणी केली. काल रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी राहुल कच्छार याला अटक केली आहे. या प्रकरणी एल टी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

